अकोला : बाजार समितीत हरभऱ्याची आवक सुरू आहे. शनिवारी हरभऱ्याला ५ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर मिळाला, तर १ हजार ९५ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला कमीत कमी ५ हजार, कमीत कमी ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
-----------------------------------------
माल वाहतुकीतून एसटीला उत्पन्न
अकोला : महामंडळाच्या एसटी बस केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहेत. प्रवासी संख्या घटल्याने एसटी बसची संख्याही कमी करावी लागली आहे. मात्र, एसटीच्या माध्यमातून माल वाहतूक सुरू आहे. त्यामुळे महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत आहे.
-----------------------------------------
खरिपासाठी गावनिहाय आढावा
अकोला : खरीप हंगामासाठी गावनिहाय आढावा घेण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे. लवकरच आढावा बैठक पार पडणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने यावर्षीही कृषी विभागाच्या नियोजनात अडसर येणार आहे.
----------------------------------------
कांद्याचा दर मिळेना!
अकोला : जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणीला आला आहे. मात्र, अद्यापही दरवाढ होत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. कांद्याला ७००- १,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दर मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे.