अकोला : बाजार समितीत शरबती गव्हाची आवक सुरू आहे. शनिवारी शरबती गव्हाला सर्वसाधारण २ हजार ५० रुपये दर मिळाला. तर कमीत कमी दोन हजार, जास्तीत जास्त २ हजार १०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत २० क्विंटल आवक झाली होती.
------------------------------------------
बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले!
अकोला : सध्या कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण तयार होत आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर वाढत आहे. अशात सर्दी-खोकला झाला तरी हा कशापासून? या विचाराने नागरिक धास्तावलेले आहेत. एकंदर दरदिवशी वातावरण बदलत आहे. त्यात आता पुन्हा कोरोना पसरत असल्याने नागरिक धास्तावले आहेत.
----------------------------------------------
रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
अकोला : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
------------------------------------------------
दुग्ध व्यवसाय आला डबघाईस!
अकोला : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो; परंतु आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे.
--------------------------------------------------