बाळापूर शहरातील औरंगपुरा भागातील वयोवृध्द विधवा महिला लिला गंगाराम बनचरे ही महिला पतीच्या निधनानंतर विटा बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दरवर्षीप्रमाणे पिढीजात कुटुंबाच्या जागेवर गरीब कुंभार समाजाला त्याचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ५०० ब्रास मातीचा गौण खनिज कर माफ असल्याने तिने जानेवारी २०२१ ला बाभूळखेड शिवारातील सर्वे नं. ३ मधून ५०० ब्रास माती वाहतुकीची परवानगी मागितली होती. मे महिन्यापर्यंत वीटभट्टी चालते. पावसाळ्यात काम बंद राहते. असे असताना तहसीलदारांच्या कार्यालयात विधवा महिला व तिचे मुले माती परवाना मिळविण्यासाठी चकरा मारत आहेत. परंतु तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी परवाना देण्यास टाळाटाळ करीत आहेत. उलट कुंभार समाजाच्या मोठ्या व्यावसायिकांना ५०० ब्रास मातीचा परवाना देऊन ५००० ब्रास मातीची वाहतूक करण्याची मोकळीत देतात. या कुटुंबाला मोठे व्यावसायिक धमकीसुद्धा देत आहेत. याबाबत बनचरे कुटुंबाने बाळापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
गरीब महिलेस माती वाहतूक परवाना देण्यास टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:18 AM