शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शेळीपालन शेडचे आठ महिन्यांपासून देयक काढण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:22 AM

नासीर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी येथील एका पशुपालकाचे गेल्या आठ महिन्यांपासून शेळीपालन शेडचे देयक काढण्यास टाळाटाळ केली ...

नासीर शेख

खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी येथील एका पशुपालकाचे गेल्या आठ महिन्यांपासून शेळीपालन शेडचे देयक काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुदानासाठी पशुपालकाने वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुकळी येथील पशुपालक सुरेश किसन भिसे यांनी ३५ हजार रुपयांच्या अनुदानावर शेळीपालन शेडसाठी पंचायत समितीमध्ये अर्ज केला होता. १९ ऑक्टोबर २०२० रोजी शेळीपालन बांधण्यास मंजुरी मिळाली. बांधकाम केल्यानंतर देयक लवकरच मिळतील, या आशेवर सुरेश भिसे यांनी व्याजाने पैसे घेऊन शेळीपालन शेडचे बांधकाम १० जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पूर्ण केले; परंतु संबंधित असलेल्या काही जणांनी पैशाची मागणी केली, पैशाची मागणी पूर्ण न केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून देयक काढण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार सुरू आहे. आठ महिन्यांपासून पशू पालकांचे हेलपाटे सुरू आहे. याबाबतची तक्रार पशुपालक सुरेश भिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली; परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने पशुपालक संकटात सापडला आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

--------------

शेळीपालन शेडच्या देयक काढण्यासाठी पैशाची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न केल्याने हेतूपुरस्पर देयक थांबविण्यात आले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली, परंतु अद्यापही दखल घेतली गेली नाही. - सुरेश किसन भिसे, पशूपालक सुकळी.

------------

देयक काढण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. शेळीपालन शेड बांधकाम केल्यावर जीएसटीचे बिल सादर केल्यावर लवकरच देयक काढले जातात. - अमोल कठोळे, लिपिक, पं. स. पातूर.