- राजरत्न सिरसाट
अकोला : कपाशीवर गुलाबी बोंडअळी,सोयाबीनवर पाच जातींच्या अळ्यांचे आक्रमण केले इतरही पिकांवर किड आहे. या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी सर्रास जहाल किटकनाशक फवारणी करण्यात येत आहे यातूनच विषबाधा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.शेतकऱ्यांनी या जहाल किटकनाशकांची फवारणी करण्यापुर्वी किडींच्या नुकसानीची आर्थिक पातळी बघूनच फवारणीचे नियोजन करणे गरजेचे आहे. तदवतच सांगितलेले निकष,सुचनेनुसारच फवारणी करणे क्रमप्राप्त आहे.अशी माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शनिवारी‘लोकमत’शी बातचित करताना दिली.
प्रश्न- पीकावरील किड,अळ््यांची तीव्रता कशी ओळखावी ?उत्तर- कीटकनाशक फवारणी करताना किडींच्या नुकसानीचा प्रकार, प्रादुर्भावाची तीव्रता,आर्थिक नुकसानीची पातळी,अवस्था आणि किडींच्या तोंडाची रचना कशी आहे, यावरू न किड किती नुकसान करणारी आहे हे लक्षात येते. जास्तच प्रकार वाढला तर कृषी विद्यापीठ, किंवा कृषी विभागाच्या तज्ज्ञांना दाखवावे. त्यानुसार कीडनाशकांची निवड करावी.
प्रश्न- कीडींच्या प्रकारानुसार कोणत्या उपाययोना कराव्या?उत्तर-आपल्याकडील पिकावर येणाºया रसशोषण करणाºया किडींच्या व्यवस्थापनाक रिता आंतरप्रवाही आणि जमिनीत वास्तव्य करणाºया किडीसाठी धुरीजन्य कीडनाशकांचीच फवारणी करावी लागते. मवाळ किडींसाठी डब्यावर हिरवा किं वा निळा त्रिकोण आहे. याच कीडनाशकांची निवड करणे गरजेचे आहे. गरज भासल्यास जहाल म्हणजे लाल, पिवळा त्रिकोण कीटकनाशक वापरावे लागते. एकाच गटांतील कीटकनाशके वारंवार फवारणी न करता आवश्यक तेव्हाच कीडनाशकांची फेरपालट करू न शिफारशीच्या मात्रा व केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेली कीटकनाशके फवारणी करावी. तणनाशक, बुरशीनाशक, रोगनाशक व इतर कोणतेही घटक शिफारस असल्याशिवाय मिसळून वापरू नयेत, तसेच शक्यतोवर दोन घटकांचे द्रावण फवारणीसाठी टाळलेच पाहिजे.
प्रश्न- किटकनाशके खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?उत्तर-शेतकºयांनी कीटकनाशके परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, तसेच पक्के बिल घ्यावे. लेबल क्लेम आणि शिफारस असलेले कीटकनाशक फवारणीसाठी आवश्यक त्या प्रमाणातच खरेदी करावीत. कीटकनाशक खरेदी करताना महिती पत्रकाची मागणी विक्रेत्याकडे करावी. माहिती पत्रकावरील सूचनांचे पालन करावे.प्रश्न- फवारणीची पध्दत कोणती?उत्तर-शेतकºयांनी उन्हात तसेच वाºयाच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, फवारणी करतेवेळी प्रथमोपचार साहित्य सोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. खाद्यपदार्थ, इतर औषधांशी कीडनाशकांचा संपर्क येऊ देऊ नये. कीटकनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाहीत, अशा गुपित किठाणी कुलूप बंद ठेवावीत, पीक, कीड व रोगनिहाय कीटकनाशकांची निवड करू न शिफारशीत प्रमाणातच फवारणीसाठी वापरावी.
प्रश्न- अलिक डे विषबाधांचे प्रकार वाढले , काय करावे?उत्तर - वर सांगितल्याप्रमाणे शक्यतो जहाल किटकनाशक वापरू नये. किडींचा प्रकार समजून घेऊनच उपचारपध्दतीचा अवलंब करावा,विषबाधा झाल्याचे लक्षात येताच वेळ न घालवता बाधित व्यक्तीस अपघात स्थळापासून सावलीच्या ठिकाणी न्यावे व ताबडतोब प्रथमोपचार करावा. विषबाधित व्यक्तीचे अंग, बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवून, कोरड्या स्वच्छ टावेलने पुसन घ्यावे. घाम येत असेल तर कोरड्या टॉवेलने पुसावा, कीटकनाशक पोटात गेले असल्यास त्या व्यक्तिला ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी. पिण्यासाठी दूध, विडी, सिगारेट किंवा तंबाखू देऊ नये. थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरू न द्यावे, श्वासोच्छवास योग्य सुरू आहे का तपासावे, श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित रोग्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करावा. झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी. बेशुद्ध पडल्यास शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे; परंतु काही खायला देऊ नये. कीटकनाशकाच्या माहितीसह डॉक्टरांक डे दाखवावे. व्यक्ती बरा झाल्यास संपूर्ण वैद्यकीय तपासणी करू न घेणे अत्यंत गरजेचे आहे.