शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

शेळीपालन शेडचे आठ महिन्यांपासून देयक काढण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:23 AM

नासीर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी येथील एका पशुपालकाचे गेल्या आठ महिन्यांपासून शेळीपालन शेडचे देयक काढण्यास टाळाटाळ केली ...

नासीर शेख

खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी येथील एका पशुपालकाचे गेल्या आठ महिन्यांपासून शेळीपालन शेडचे देयक काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुदानासाठी पशुपालकाने वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सुकळी येथील पशुपालक सुरेश किसन भिसे यांनी ३५ हजार रुपयांच्या अनुदानावर शेळीपालन शेडसाठी पंचायत समितीमध्ये अर्ज केला होता. १९ ऑक्टोबर २०२० रोजी शेळीपालन बांधण्यास मंजुरी मिळाली. बांधकाम केल्यानंतर देयक लवकरच मिळतील, या आशेवर सुरेश भिसे यांनी व्याजाने पैसे घेऊन शेळीपालन शेडचे बांधकाम १० जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पूर्ण केले; परंतु संबंधित असलेल्या काही जणांनी पैशाची मागणी केली, पैशाची मागणी पूर्ण न केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून देयक काढण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार सुरू आहे. आठ महिन्यांपासून पशू पालकांचे हेलपाटे सुरू आहे. याबाबतची तक्रार पशुपालक सुरेश भिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली; परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने पशुपालक संकटात सापडला आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

--------------

शेळीपालन शेडच्या देयक काढण्यासाठी पैशाची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न केल्याने हेतूपुरस्पर देयक थांबविण्यात आले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली, परंतु अद्यापही दखल घेतली गेली नाही.

- सुरेश किसन भिसे, पशूपालक सुकळी.

------------

देयक काढण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. शेळीपालन शेड बांधकाम केल्यावर जीएसटीचे बिल सादर केल्यावर लवकरच देयक काढले जातात.

- अमोल कठोळे, लिपिक, पं. स. पातूर.