मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न ९ आणि सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत याकरिता ११ गुन्ह्यांची, अशा एकूण २० गुन्ह्यांची अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी शिफारस केली आहे. त्या अनुषंगाने या पुरस्कारांसाठी ८१ पोलीस अधिकारी अंमलदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत भादंवि कलम ४६१, ३८० या गुन्ह्यातील सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगतप्रकरणी १५ हजार रुपये रोख पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे, शक्ती कांबळे, वसीम शेख, संदीप ताले यांना हा पुरस्कार व बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
पोलीस उपमहानिरीक्षकांच्या हस्ते होणार गौरव
अपर पोलीस महासंचालक यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र संबंधित पोलीस आयुक्त, परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या स्तरावर विशेष समारंभाचे आयोजन करून त्यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचारी यांना गौरव करण्यात येणार आहे.