येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थाच्या वतीने जागतिक प्राणीजन्य रोग दिनाचे औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांच्या अध्यक्षतेखाली व प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. मोहन गोहत्रे अमरावती विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या व्याख्यानाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रवीण राठोड यांनी केले.
डॉ. बारबुद्धे पुढे म्हणाले की, एकंदरीत १४ जंतूमुळे मानवात रोग होतात. त्यातील ६१ टक्के जंतू प्राण्यातही आढळतात. भारतात ५६ प्राणीजन्य आजाराची नोंद झाली असून रेबीज ब्रुसेलोसिस, क्षयरोग, लेप्टोसायरोसिस, ॲन्थरँक्स, सिस्टीसरकोसिस आदी १३ रोग प्रामुख्याने आढळतात. या ऑनलाइन व्याख्यानास राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, पशुवैद्यक, पशुधन पर्यवेक्षक पशुपालक, शेतकरी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. रणजित इंगोले यांनी केले, तर आभार डॉ. गिरीश पंचभाई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण बनकर, डॉ. ज्ञानेश्वर काळे व श्री. भास्कर वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
२.७ दशलक्ष लोक प्राणीजन्य आजाराने बाधित
अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलताना डॉ. भिकाने म्हणाले की, भारत हा प्राणीजन्य रोगांचा हॉटस्पॉट असून मानवामध्ये उद्भवणारे उदयोन्मुख आजारापैकी ७५% आजार हे प्राणीजन्य आहेत व आजघडीला भारतातील २.७ दशलक्ष लोक प्राणीजन्य रोगाने बाधित होत असल्याचे तर २.५ लक्ष लोक मृत्युमुखी पडत असल्याचे नमूद केले.