अकोला: वीजेमुळे जीवन सहज आणि सुसह्य झाले आहे ,पण वीजेपुढे चूकीला क्षमा नाही हे त्रिकालबाधीत सत्य लक्षात घेता वीजेशी संबधित काम करताना किंवा विजेवर चालणारी उपकरणे हाताळताना सुरक्षितता हीच एकमेव सुरक्षा असल्याचे प्रतिपादन अकोला मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले.महावितरण अकोला मंडळ कार्यालयाच्या वतीने शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित विद्युत अपघात व सुरक्षा याबाबत आयोजित शिबीरात ते बोलत होते. या शिबीरात निवृत्त मुख्य अभियंता खंडागळे,कार्यकारी अभियंते प्रशांत दानी, अजय खोब्रागडे,विद्युत निरिक्षक राजीव महालक्ष्मे , मीलन वैष्णव , अतीरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पैकीने ,समीर देशपांडे,मनोज अनसिंगकर प्रामुख्याने उपस्थित होते.महावितरण कर्मचाऱ्यांचा दैनंदिन संबध हा वीजेशीच येत असल्याने एक चूक किंवा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. प्रसंगी प्राणहानीही नाकारू शकत नसल्याने कर्मचाऱ्यांनी वीजेची कामे हाताळताना सुरक्षीततेची खबरदारी घेऊनच काम करायला पाहीजे या संकल्पनेतून शिबिर आयोजित करण्यात आले होते. अपघात हा महावितरण कर्मचाºयाचा असो वा कोणाचाही असो, अपघात हा अपघात असतो. अपघात हा एकट्याचा होत नसून त्या संपूर्ण कुटूंबाचा होत असतो अशी भावनिक साद घालत अधीक्षक अभियंता यांनी सर्व तांत्रिक कर्मचाºयांना सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन केले.तर अपघात वीरहीत यंत्रणा कशी असावी,सुरक्षीत वीज संचाची मांडणी,उपाययोजना,महावितरण कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी व त्यांच्या जबाबदाºया याबाबत विद्युत निरीक्षक महालक्ष्मे व वैष्णव यांनी सखोल मार्गदर्शन केले. अतीरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांनी अपघाताची कारणे आणि त्याला टाळण्यासाठी असलेल्या उपाय योजना या विषयी माहीती दिली. यावेळी निवृत्त मुख्यअभियंता खंडागळे यांनीही सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन केले.या शिबीराला महावितरणचे अकोला ग्रामीण व शहर विभागाचे तांत्रिक कर्मचारी , यंत्रचालक व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शनअशोक पेटकर यांनी केले.