गावागावात लोककल्याणकारी योजनेमधील माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच शेती व्यवसायाच्या विकासासाठी विकेल ते पिकेल, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती व जनआरोग्य योजना तसेच शिवभोजन थाली व एम.ए.एच.बाबत इत्यादी विविध योजनांची माहिती लोककला व पथनाट्य जनजागृती कार्यक्रमाद्वारे देण्यात आली. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अध्यक्ष लोकशाहीर विशाल राखोंडे, शाहीर प्रकाश इंगोले, बाळू देवकर, लोककवी सागर राखोंडे, नालवादक दिव्यांग कैलास शिरसाठ, ज्येष्ठ कलाकार सिद्धार्थ इंगळे, सुखदेव उपर्वट, युवा कलावंत श्याम उगले, सागर पद्मने, हरिओम राखोंडे, ज्योती राखोंडे, पल्लवी मांडवगणे यांनी नाटकातून जिवंत प्रसंग सादर केला. या वेळी गावातील सरपंच, सचिव, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, रोजगार सेवक व बचतगटातील महिला उपस्थित होत्या.
फोटो: