व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार तथा श्रमिक पत्रकार संघाचे सल्लागार महेंद्र कविश्वर उपस्थित हाेते. पत्रकाराकडे समाज आरसा म्हणून बघतो. त्यामुळे पत्रकारांनी सामाजिक जबाबदारी ओळखावी. समाजात कार्यरत विविध घटकातील सकारात्मक व चांगल्या बाबींचीही दखल घेतली गेली पाहिजे, असे मत महेंद्र कविश्वर यांनी व्यक्त केले. चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी समाजाच्या वेदना प्रकर्षाने मांडण्याची अपेक्षा कविश्वर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रा.किशाेर बिडवे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथाेचित सत्कार करण्यात आला. यावेळी श्रमिक पत्रकारसंघाचे अध्यक्ष अजय डांगे यांनी माणिकराव कांबळे यांच्या संघर्षमय प्रवासाची मांडणी केली. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव आशिष गावंडे यांनी केले. कार्यक्रमाला राजेश शेगाेकार, मनाेज भिवगडे, सचिन देशपांडे, जीवन साेनटक्के, शरद पाचपाेर, गाेपाल हागे, महेश घाेराळे, गणेश साेनाेने, ॲड. जयेश गावंडे, प्रवीण ठाकरे, प्रवीण खेते, माे. साकीब, करुना भांडारकर, हर्षदा साेनाेने, सुरेश राठाेड, बंटी नांदूरकर, राजू चिमणकर तसेच श्रमिक पत्रकारसंघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित हाेते.
''''''''''''''''सहवासातून सकारात्मक प्रवास घडला''''''''''''''''!
पत्रकारितेच्या वाटचालीत अनेक ज्येष्ठांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सहवासातून चांगले गुण वेचत मी येथपर्यंत पोहोचलो असून, माझ्यासाठी वय आणि अनुभवाने लहान असणारे सर्वच जण मार्गदर्शक आहेत. या सन्मानामुळे हा प्रवास सार्थक झाल्याचे समाधान वाटते, अशी भावना ज्येष्ठ पत्रकार माणिकराव कांबळे यांनी व्यक्त केली.