शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

७१६ कोटी रुपयांचे ‘बॅरेज’ विजेअभावी ठरले ‘वांझोटे’!

By admin | Published: January 05, 2017 2:16 AM

सिंचनाचा तिढा कायम; ११७ कोटींचा विजेचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित

सुनील काकडे वाशिम, दि. ४- जिल्हय़ातील सिंचनाचा वाढता अनुशेष कमी करण्यासाठी शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खचरून बॅरेज उभे केले. मात्र, कोट्यवधी लीटर पाणी अडूनही विजेअभावी हे पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य ठरत असून, विजेसंदर्भातील सुविधांचा ११७ कोटी रुपयांचा प्रस्तावही शासन स्तरावर अद्याप प्रलंबित आहे.जिल्ह्यात सिंचनाचा सुमारे ५00 कोटी रुपयांचा अनुशेष आजही कायम आहे. तो दूर करण्यासाठी तद्वतच सिंचनाअभावी शेतकर्‍यांची होणारी ससेहोलपट थांबविण्याकरिता शासनाने पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ह्यबॅरेजेसह्णची कामे केली आहेत. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५,५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २,१३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. डिसेंबर २0१५ मध्ये या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळेच ११ ही बॅरेजची कामे वेळेत पूर्ण होऊन ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. असे असताना बॅरेज परिसरातील विजेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या ह्यबॅरेजह्णची उपयोगिता शून्य ठरत आहे.प्रकल्प परिसरात गरज आहे या सुविधांचीविजेची समस्या सोडविण्यासाठी गणेशपूर, जयपूर आणि नारेगाव या तीन ठिकाणी ३३/११ ह्यकेव्हीह्णचे तीन वीज उपकेंद्र उभारणे आवश्यक आहे. त्यावर ५ ह्यएमव्हीएह्णचे ६ ट्रान्सफार्मर आणि १00 ह्यकेव्हीएह्णचे ९४२ ट्रान्सफार्मर बसवावे लागणार आहेत. याशिवाय अडोळी आणि वाई येथे ५ ह्यएमव्हीएह्णचे २ अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविणे, नव्याने तयार होणार्‍या उपकेंद्रापर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी ३३/११ ह्यकेव्हीह्णची विद्युत वाहिनी टाकण्यासह इतरही बरीच कामे करावी लागणार आहेत. तसा सविस्तर प्रस्ताव महावितरणने शासनाकडे सादर केला आहे.जलसंपदा विभागाने दिवसरात्र एक करून पैनगंगा नदीवरील बॅरेजची कामे पूर्ण करून घेतली. दज्रेदार स्वरूपात झालेल्या या कामांमुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले. मात्र, जोपर्यंत शेतकर्‍यांना वीज कनेक्शन पुरविले जाणार नाहीत, तोपर्यंत या पाण्याचा सिंचनासाठी कुठलाच फायदा होणार नाही.जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिमपैनगंगा नदीवरील ११ ही बॅरेजेससह इतर प्रकल्प परिसरात विजेसंदर्भातील सुविधा पुरविण्यासाठी महावितरणने ११७ कोटी रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. निधी मंजूर होताच प्रस्तावित कामे केली जातील.डी.आर. बनसोडे अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम