शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बाबा भांड यांना ना हरकत दिली तरी कुणी?

By admin | Published: August 14, 2015 11:15 PM

आयुक्त कार्यालयाकडून शोध सुरू; पश्‍चिम व-हाडात अधिका-यांना विचारणा.

राजेश शेगोकार /बुलडाणा : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यीक व प्रकाशक बाबा भांड यांची नियुक्तीवर उठलेले वादळ शमण्याची चिन्हं दिसत नाहीत. फसवणूक प्रकरणात आरोपी असतानाही त्यांच्या नियुक्तीबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ना हरकत देण्यात आली होती, असे वक्तव्य शिक्षण मंत्र्यांनी केल्यानंतर, ती वादग्रस्त ना हरकत नेमकी दिली तरी कुणी, याचा शोध आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी युद्ध पातळीवर घेतला. त्यासाठी पश्‍चिम वर्‍हाडातील सर्व जिल्हा प्रशासनांना विचारणा करण्यात आली. साहित्य संस्कृती मंडळाचे प्रमुखपद हे साहित्य क्षेत्रात अतिशय महत्वाचे मानले जाते. या पदावर बाबा भांड यांची नियुक्ती झाल्यानंतर साहित्यक्षेत्रातून आक्षेप घेतला जात आहे. या आक्षेपामध्ये भांड यांच्यावर बुलडाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे. साक्षरता अभियानाच्या काळात नवसाक्षरांना साहित्य पुरविण्याच्या व्यवहारात गैरप्रकाराची तक्रार झाली होती. या प्रकरणात भांड हे आरोपी असून त्यांना पोलीस कोठडीतही ठेवण्यात आले होते. बुलडाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्यावरही अशाच प्रकरणात गुन्हा दाखल असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. साक्षरता अभियानाचे साहित्य पुरविण्यात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असणारा साहित्यीक साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी कसा, हा प्रश्न साहित्य वतरुळातून उपस्थित होत असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भांड यांच्या नियुक्तीसंदर्भात ना हरकत नसल्याची माहिती अमरावती विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली होती, असे वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. याबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय मात्र अनभिज्ञ आहे. शुक्रवारी आयुक्त कार्यालयातून बुलडाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वाशीम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, सामान्य प्रशासनचे उप मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांना याबाबत विचारणा करण्यात आली. भांड यांच्या प्रकरणात बुलडाणा येथील न्यायप्रविष्ट प्रकरणाची मोठी अडचण असल्यामुळे बुलडाणा जिल्हा प्रशासनानेही त्यांच्या अखत्यारीतील विविध कार्यालयांमध्ये विचारणा केली. यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, याबाबत मंत्रालयातून विचारणा होत असल्याचे पश्‍चीम वर्‍हाडातील सर्वच जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी स्पष्ट करून, याबाबत जास्त माहिती देण्यास नकार दिला. काही साहित्यीकांनी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदासाठी कुणाच्याही शिफरशीची गरज नसते; मात्र त्या व्यक्तीच्या संदर्भात प्रशासनाकडून माहिती घेतली जाते. भांड यांचे कार्यक्षेत्र मराठवाडा असले तरी त्यांच्या एकूणच ह्यबायोडाटाह्णमध्ये बुलडाणा अडचणीचा विषय ठरत असल्याने, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर यासंदर्भात दोषारोपण केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. *भांड यांच्या बाबतीतही 'निशाणी डावा अंगठा' ज्या साक्षरता अभियानाच्या साहित्य पुरवठा प्रकरणात भांड दोषी आहेत, त्या अभियानावरच प्रख्यात लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी 'निशाणी डावा अंगठा' ही कादंबरी लिहीली असून, तिला अनेक पुरस्कारही मिळाले.याच कादंबरीवर आधारीत चित्रपटही गाजला. याच 'निशाणी डावा अंगठा' या विधानाचा प्रत्यय शुक्रवारी जिल्हा प्रशासनात आला. अनेक अधिकार्‍यांना कोण हे भांड, आणि बुलडाण्याशी त्यांचा काय संबध असा प्रश्न पडला होता. काही अधिकार्‍यांनी आपल्या कार्यालयाने भांड यांची कोणत्या पुरस्कारासाठी शिफारस केली होती का, याचीही विचारणा कनिष्ठांना करून आपल्या 'साहित्य क्षेत्राविषयीच्या' ज्ञानाचा प्रत्यय दिला.