बार्शीटाकळी : दिवंगत नेते माजी मंत्री योजनामहर्षी बाबासाहेब धाबेकर यांचे कार्य आणि विचार आजही प्रेरणादायी असून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील वारसा अखंडित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जि. प. सदस्य तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर यांनी केले. धाबा येथील ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेब धाबेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं. चे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. धाबेकर मित्रमंडळ व युगंधर मंडळातर्फे बाबासाहेब धाबेकरांना अभिवादन केले. बाबासाहेब धाबेकरांच्या जयंतीनिमित्त जनता शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीटाकळी द्वारा संचालित बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक गजेंद्र काळे, उपमुख्याध्यापक राहुल इंगळे, सुपरवायझर विलास ताठे, अ. सुबुर खान व शिक्षक यांनी अभिवादन केले. बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घोटा येथे मुख्याध्यापक संजय अग्रवाल व शिक्षक यांनी, बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय व पार्वतीबाई जनता विद्यालय राहित येथे मुख्याध्यापक सुभाष वाघ व शिक्षक यांनी, बाबासाहेब धाबेकर उर्दू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुरूम येथे मुख्याध्यापक सईद उल्लाखान व शिक्षक यांनी, बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केशवनगर (मसलापेन)येथे मुख्याध्यापक मधुकर चव्हाण व शिक्षक यांनी, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा येथे प्राचार्य डॉ. सुभाष गवई व शिक्षक यांनी, बाबासाहेब धाबेकर उर्दू अध्यापिका विद्यालय अकोला येथे प्राचार्या हमीदा बी व शिक्षक यांनी, बाबासाहेब धाबेकर अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा धाबा येथे मुख्याध्यापक संदीप चव्हाण व शिक्षक यांनी, बाबासाहेब धाबेकर इंग्लिश स्कूल बार्शीटाकळी येथे मुख्याध्यापिका रेश्मा परवीन व शिक्षक यांनी, बाबासाहेब धाबेकर अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा छावणी येथे मुख्याध्यापिका विद्या फाले व शिक्षक यांनी अभिवादन केले.
बाबासाहेब धाबेकरांचे कार्य आणि विचार आजही प्रेरणादायी-सुनील धाबेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:36 AM