अकोला: अकोला जिल्हय़ाला खेळाची वैभवशाली क्रीडा परंपरा लाभली आहे. साठच्या दशकात अकोला फुटबॉल समृद्ध होता. फुटबॉलचे गतवैभव मिळविण्यासाठी स्पर्धांंचे वेळोवेळी आयोजन होणे गरजेचे आहे. यासाठीच नोव्हेंबर महिन्यात अखिल भारतीय स्तर फुटबॉल चषक स्पर्धा घेण्याचा संकल्प केला असल्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोला जिलचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, अकोला क्रीडाक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासकीय व्यवस्थेतून जे काही पाहिजे असेल, ते जेवढे पारड्यात पडेल, तेवढे पाडून घेण्याची इच्छा आहे. त्यासाठी क्रीडा संघटनांच्या सहकार्याची आणि सकारात्मक दृष्टिकोणाची आवश्यकता असल्याचेही म्हणाले.अकोला जिलत ज्यावेळी खेळाच्या संपन्नतेचे दिवस होते. त्यावेळच्या आठवणींना डॉ. पाटील यांनी उजाळा दिला. अकोल्यात इनायतउल्ला फुटबॉल स्पर्धेचे भव्य-दिव्य प्रमाणात आयोजन होत असे. आक्टोबर-नोव्हेंबरमधील दिवस असल्याने बाजारात हरभरा राहायचा. चार आण्याचा हरभरा घेऊन मैदानात जाऊन सामने बघण्याचा आनंद काही औरच असायचा. आजही बालपणातल्या फुटबॉल सामन्यांच्या त्या आठवणी मनात साठवून ठेवलेल्या असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
नोव्हेंबरमध्ये होणार अकोल्यात अ.भा.फुटबॉल स्पर्धा
By admin | Published: June 08, 2015 1:26 AM