येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी परिसरातील तामसी, देगाव, चिंचोली गणू, नकाशी, हिंगणा, तुलंगा, दिग्रस, बेलुरा, धनेगाव, बटवाडी, पिंपळगाव, टाकळी खुरेशी असे जवळपास २५ ते ३० खेडी जोडलेली आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रात नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी गरोदर माता प्रसूतीसाठी आल्यास त्यांना येथील डॉक्टरांना लहान खोलीत नियोजन करून कमी जागेत वापर करून प्रसूती करावी लागत असल्याचे चित्र आहे. या केंद्राच्या बाहेर प्रसूतिगृहाची इमारत आहे. फेब्रुवारी मार्च २०२० रोजी या नवीन कामास सुरुवात करण्यात आली होती. लॉकडाऊनचे कारण समोर आल्याने आज जैसे थे दिसून येत आहे. प्रसूतिगृह इमारतीत सुविधांचा अभाव असल्याने महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रसूतिगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (फोटो)
वाडेगाव येथील आरोग्य केंद्रातील प्रसूतिगृहाच्या इमारतीची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:20 AM