अकोला : मुंबई-हावडा लोहमार्गावरील चाळीसगाव येथे पायाभूत सुविधा निर्मितीचे कार्य हाती घेण्यात येणार असल्याने या मार्गावरील बडनेरा-नाशिक मेमू गाडी गुरुवार, २१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. छोट्या स्थानकांवर थांबा असलेली ही गाडी सहा दिवस धावणार नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येथे यार्ड रिमॉडलिंग करीता नॉन इंटरलॉकिंग चे कार्य हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक-बडनेरा विशेष २१ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक विशेष २१ मार्च पर्यंत रद्द करण्यात आहे. ही गाडी अकोला मार्गे धावणारी असल्याने अकोलेकर प्रवाशांचीही गैरसोय होणार आहे.