केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा केली जात आहे. पाणीपुरवठा याेजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने ११० काेटी रुपये मंजूर केले असून मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरात नवीन आठ जलकुंभांची उभारणी करणे, नळांना मीटर लावणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी ‘एपी ॲँड जीपी’ एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे साेपविण्यात आली आहे. बहुतांश प्रभागांमध्ये टाक्यांचे जोडणीचे काम अपूर्ण आहे. शहरात काही भागांमध्ये तीन दिवसाआड, तर काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे निर्दशनास आले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुमंत मोरे, उपायुक्त वैभव आवारे, माजी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती संजय बडोणे, नगरसेवक मिलिंद राऊत, धनंजय धबाले, अमोल गोगे, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच. जी. ताठे तसेच सामाजिक कार्यकर्ते जयंत मसने, जलप्रदाय विभागाचे नरेश बावणे, कैलास निमरोट, संदीन चिमनकर, तुषार टिकाईत, रामेश्वर दौड आदींची उपस्थिती होती.
पाणीपुरवठा याेजनेचा बाेजवारा; बहुतांश कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:17 AM