अकोला : कारमधील रोख व दागिने लंपास केल्याच्या घटना थांबता थांबेनात. एक घटना घडली तर लागलीच दुसरी घडते. सोमवारी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास पांढकवड्याच्या सराफा व्यापार्याच्या कारमधील बॅग लंपास केल्याची घटना घडली. बॅगेत नकाशी बॉन्डसह २ लाख ७७ हजार रुपयांचे चांदीची भांडी होती. यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथील सराफा व्यापारी अचल सतीश सिंघानिया (२४) हे गांधी रोडवरील विश्वकर्मा ज्वेलर्समध्ये सोमवारी सायंकाळी आले. त्यांनी ज्वेलर्ससमोरील रस्त्यावर त्यांची एमएच २९ आर. ७४७७ क्रमांकाची कार उभी केली आणि ते ज्चवेलर्समध्ये गेले. दरम्यान त्यांच्या कारमध्ये ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. बॅगेमध्ये ७0 नकाशी बॉन्ड आणि २ लाख ७७ हजार ७00 रुपयांची चांदीची भांडी व काही दागिने होते. ज्वेलर्समधून बाहेर आल्यावर त्यांना कारमधील बॅग दिसून आली नाही. त्यांनी कारमध्येच शोधाशोध केली; परंतु बॅग न दिसल्याने, त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पांढरकवड्याच्या सराफा व्यापा-याच्या कारमधून बॅग लंपास
By admin | Published: September 25, 2014 2:55 AM