अकोला: बाळापूर मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत असून, गुरूवारी बाळापुर मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी ९ वाजतापासून सुरूवात झाली. मतमोजणीदरम्यान बाळापूर मतदारसंघात अनपेक्षितपणे भाजप-सेना युतीचे उमेदवार नितीन देशमुख यांनी नवव्या फेरीत ६ हजार १२0 आघाडी घेतली आहे. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर अद्यापही स्पर्धेत आहेत. एमआयएमचे डॉ. रहेमान खान यांनी ९ हजारावर मते घेऊन तिसरा क्रमांक पटकावला.बाळापूर मतदारसंघात भाजप-सेना युतीचे नितीन देशमुख, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. पुंडकर, काँग्रेस-राकाँ महाआघाडीचे संग्राम गावंडे आणि एमआयएमचे डॉ. रहेमान खान रिंगणात आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. मतदारसंघात सुरूवातीला महाआघाडी, वंचित बहुजन आघाडीत काट्याची लढत होईल. असे चित्र होते. परंतु अनपेक्षितपणे सेनेचे नितीन देशमुख यांनी मुसंडी मारत, आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीअखेर सेनेला २७ हजार २९७ मते घेतली. वंचितने २१ हजार १७७ तर राकाँचे संग्राम गावंडे ६ हजार ९७५ मते घेतली आहे. एमआयएमने ९ हजार ६४९ मते घेतली आहे. मतदारसंघात सेना व वंचित बहुजन आघाडीमध्ये काट्याची टक्कर पाहावयास मिळत आहे.
बाळापूर निवडणूक निकाल : बाळापुरात शिवसेना पुढे, वंचितही स्पर्धेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:08 AM