अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी करण्यात आलेल्या १ लाख ७५ हजार ५८३ शेतकऱ्यांपैकी ९२ हजार ५८३ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले असून, उर्वरित शेतकºयांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. त्यामुळे ‘पीएम-किसान’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८३ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक लवकरच आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात येणार आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकºयांना प्रतिवर्ष दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वितरित करण्याची योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत गत ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ५८३ शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ५८३ शेतकºयांपैकी ९२ हजार ५८३ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले असले तरी, उर्वरित ८३ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही. त्यानुषंगाने यासंदर्भात कृषी खात्याच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार ‘पीएम-किसान’ सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ नसलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. त्यानुसार नागरी सुविधा केंद्रांमार्फत जिल्ह्यातील ८३ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात येणार आहेत.