धीरज चहाजगुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी दहा ते बारा महिन्यांपूर्वी कर्ज मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रकरण दाखल केले होते. हे कर्जप्रकरण मंजुरीकरीता भारतीय स्टेट बँक तेल्हारा शाखेने अकोला येथील विभागीय बँकेकडे पाठवले. दहा ते बारा महिने होऊनही उत्तर मिळत नसल्याने अर्जदाराने अनेकदा पाठपुरावा केला. तेल्हारा शाखेने सुद्धा त्याबाबत पाठपुरावा केला, पण काही उत्तर मिळत नसल्याने अखेर अर्जदार धीरज चहाजगुणे यांनी बँकेला तक्रार दिली. या तक्रारीत मी आरबीआयकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांची वैधता संपुष्टात येणार असल्याने कागदपत्रे याकरिता लागलेला खर्च सुद्धा व्यर्थ जाणार, असे तक्रारीमध्ये नमूद केले होते. त्यावर विभागीय बँकेने त्रूटी काढून कर्ज प्रकरण नामंजूर करीत प्रकरण परत केले. हे प्रकरण कागदपत्रे व व्यवहार पाहून कर्ज नामंजूर केले नसून, केवळ हेतुपुरस्सर कर्ज नामंजूर केले असल्याचा आरोप अर्जदार धीरज चहाजगुणे यांनी केला.
या प्रकरणात स्टेट बॅंकेचे मॅनेजर शरद पाटील यांचे संपर्क साधला असता त्यांनी अर्जदार यांचेशी असलेले व्यवहार व कागदपत्रे पाहता आम्ही सकारात्मक होतो, पण वरिष्ठ कार्यालयाने कर्ज प्रकरण पाठविले आहे. यामध्ये मी काहीही करू शकत नसल्याचे सांगितले.