लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खात्यासोबत आधार लिंक करणे, त्याची पडताळणी कर ताना शेतकर्यांच्या नाकी नऊ आल्यानंतर काही बँकांनी पुन्हा शेतकर्यांना आधार कार्डची झेरॉक्स जमा करण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे अनेक बँकांमध्ये शेतकर्यांची गर्दी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात शेतकर्यांना प्रचंड त्रास झाला. त्यासाठी आधी बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक करण्यात आले. त्यानंतर त्यावेळी सर्व्हर डाउन होणे, ही समस्या याच भागात मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली. त्यातच पती-पत्नीचे आधार क्रमांक आणि माहितीची पडताळणीसाठीही मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला. काहींच्या हाताचे ठसे तर अखेरपर्यंतही जुळले नाहीत. त्यांचे अर्ज ओटीपी पद्धतीने दाखल करण्यात आले. बँक खा त्याशी आधार क्रमांक लिंक नसलेले तसेच आधार क्रमांकांच्या माहितीची पडताळणी न झालेल्या शेतकर्यांना बँकेत आधार जमा करणे बंधनकारक करण्यात आले. त्याचवेळी ज्यांचे आधार खात्याशी लिंक आहे, माहितीची पड ताळणी झाली, त्यांनी ते बँकेत जमा करण्याची गरज नाही. तरीही जिल्हय़ातील अनेक बँकांनी संबंधित गावांमध्ये दवंडी िपटवली. त्यामध्ये सर्वच खातेदारांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत शनिवारपर्यंत शाखेत जमा करण्याचे बजावण्यात आले. त्यामुळे अनेक गावांतील शेतकर्यांचा गोंधळ उडालेला आहे. एकाच दिवशी सर्व शेतकरी बँकेत धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेचा प्रतापउमरी परिसरातील स्टेट बँक कृषी विकास शाखेत सरसकट सर्वच खातेदारांना आधार कार्ड आणण्याची सक्ती करण्यात आली आहे. आधार क्रमांक खात्याशी लिंक असलेल्या शे तकर्यांनी याबाबत विचारणा केली असता झेरॉक्स प्रत देण्यात तुम्हाला अडचण आहे का, असा प्रतिप्रश्न केला जात आहे. त्या झेरॉक्सवर सात-बारातील शेतीचा गटक्रमांकही नोंदवून घेतला जात आहे. या प्रकाराने हतबल झालेले शेतकरी शाखेत धाव घे त आधार कार्ड जमा करीत आहेत.
बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असलेल्या शेतकर्यांनी पुन्हा आधार कार्ड देण्याची गरज नाही. ज्यांचे अर्ज आधारची पडताळणी न करता भरण्यात आले, त्यांनी व ज्यांचे बँक खा त्याशी आधार लिंकिंग झाले नाही, त्यांनीच आधार कार्ड जमा करावे, बँकांनी सरसकट सर्वांचे आधार घेण्याची गरज नाही. - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बँक.