अकोला, दि. १0- अकोला बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी पार पडली असून, या निवडणुकीत अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. सत्यनारायण जोशी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अँड. गजानन खाडे आणि सचिवपदी अँड. इलियास शेखानी निवडून आले.अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आले. अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अँड. सत्यनारायण जोशी यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. यामध्ये उपाध्यक्ष पदासाठी अँड. शंकर ढोले, अँड. प्रवीण होनाडे, अँड. दीपाली देशमुख, अँड. गजानन खाडे आणि अँड. बी. एम. इंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील अँड. गजानन खाडे यांनी विजयश्री प्राप्त करून अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्षपद काबीज केले, तर सचिव पदासाठी अँड. अश्वीन काळे, अँड. महेश सरप आणि अँड. इलियास शेखानी रिंगणात होते. यामध्ये अँड. इलियास शेखानी यांचा विजय झाला. आता अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. सत्यनारायण जोशी, उपाध्यक्षपदी अँड. गजानन खाडे आणि सचिवपदी अँड. इलियास शेखानी यांची निवड झाली आहे.