न.प. प्रशासनास दिलेल्या निवेदनानुसार, शहरात जवळपास अंदाजे ५२ फॅक्टरी आहेत. यामध्ये मजुरांना काम करताना जीवितहानीचा धोका होऊ नये व कोणतीही अनुचित घटना भविष्यात घडू नये, याकरिता शहरात अग्निशामक दल उपलब्ध करून द्यावे, शहरातील रस्त्यांवर गटारांमध्ये घाण कचरा साचत असल्याने रोगराईस निमंत्रण मिळत आहे. परिणामी, विविध साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने कचराकुंड्यांची व्यवस्था करावी, शहरातील अतिसंवेदनशील जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून होणाऱ्या विविध घटनांना आळा बसेल. तसेच शहरातील तरुण सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय उपलब्ध व्हावा म्हणून नगरपंचायतीने मॉलकरिता बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही दुकाने भाडेतत्वावर देऊन बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, बार्शीटाकळी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, शासनाने मंजूर केलेली नळयोजना त्वरित कार्यान्वित करावी, या प्रमुख मुद्द्यांवर नगरपंचायतीने तातडीने विचार करून आवश्यक सोयीसुविधा निर्माण कराव्या, अशी मागणी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, वंचित बहुजन आघाडीचे अमोल जामनिक, गोबा शेठ, नगरसेवक अनिल धुरंधर, नासिर मास्टर, श्रावण भातखडे व रतन आडे, फिरोज खान, श्रीकृष्ण देव कुणबी, रितेश खरात, सुबोध गवई, आशिष खंडारे, इम्रान खान, प्रवीण वानखडे, सनी धुरंधर, रोहन कांबळे, रक्षक जाधव, धीरज धुरंधर, हरीश रामचौरे, शुभम कांबळे, मुकेश सुरवाडे आदींनी केली आहे.
बार्शीटाकळी: न. पं.ने सुरक्षा साहित्यासह सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:20 AM