शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना ‘अथार’ चा आधार !

By admin | Published: June 24, 2016 11:43 PM

पेरणीसाठी मदतीचा हात; शेतक-यांना दिले जाते जेवण.

नाना हिवराळे / खामगावगेल्या तीन वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच महागाईने कंबरडे मोडले असून खरिपातील पेरणीच्या सोयीसाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत. दरम्यान, पेरणीसाठी वाढलेला खर्च शेतकर्‍यांना झेपावणारा नसल्यामुळे ग्रामीण भागातील पेरणीची अथार ही पद्धत शेतकर्‍यांना आधार ठरणार आहे.शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी आदी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. बैलाची संख्या कमी असल्याने पेरणीचा अवाजवी खर्च शेतकर्‍यांना पेलावा लागत आहे. सायळ पद्धतीने पेरणी केली जात असे यामुळे पेरणीच्या खर्चाची बचत होत असे; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दुसर्‍याकडून पेरणी करताना शेतकर्‍यांना ट्रॅक्टरने ४00 रुपये प्रती एकर तर बैलजोडीने ७00 रुपये एकर किंमत मोजावी लागत आहे. अगोदरच सततच्या दुष्काळाने शेतकरी पार खचला आहे. गत तीन वर्षांपासून शेतीतून पेरणीच्या खर्चाऐवढेही उत्पन्न निघाले नसल्याने दरवर्षी कर्जाचे पुनर्गठन सुरू आहे. यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागात फार पूर्वीपासून पेरणीची अथार पद्धत प्रचलित होती; मात्र काळाच्या ओघात काही प्रमाणात ती मागे पडली आहे. परंतु सद्यस्थितीत हीच अथार पद्धत शेतकर्‍यांना आधारवड ठरू शकते. गावातील ज्या शेतकर्‍याकडे पेरणीसाठी बैलजोडी नसेल व त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असेल तर अशा शेतकर्‍यांची शेती पडीक राहू नये याकरिता इतर शेतकरी त्या शेताची पेरणी करीत असत. या पेरणीसाठी लागणार्‍या खर्चाची रक्कम न घेता त्या शेतकर्‍याजवळून केवळ मोबदला म्हणून एक वेळचे जेवण घेतले जायचे. यामुळे गरीब शेतकर्‍यांना अथार पद्धतीचा आधार होत असे.