अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असून, शनिवार, २७ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत २१ अकोल्यात २१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे करपणाºया उर्वरित पिकांना जीवनदान मिळाले; परंतु मूग, उडिदाची वाढ खुंटलेली असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.चार आठवड्यांच्या विश्रांतीनंतर २६ जुलैपासून पावसाचे पुनरागमन झाले असून, २७ जुलै रोजी दिवसभर तुरळक स्वरू पाचा पाऊस कोसळत होता. शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ५.६ मि.मी. पावसाची नोंद स्थानिक हवामानशास्त्र विभागाने केली आहे. २७ जुलैपर्यंत झालेल्या पावसात दम नसला तरी पिकांना जीवनदान मिळाले; पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच. अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात शनिवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत ३.९ टक्के जलसाठा होता. हा जलसाठा अकोलेकरांची तहान आता ३९ दिवस भागवू शकतो. त्यासाठी काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे.दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची पेरणी उलटली किंवा करपली, त्यांना रब्बी पिकाच्या पेरणीसाठी दमदार पावसाचीच गरज आहे. तथापि, त्यांच्याकडे आता पैसाच नसल्याने बी-बियाणे खरेदी करावे कसे, असा प्रश्न आहे.
- पीक कर्जाचा पैसा खरिपात लावला आता काय?हजारो शेतकºयांनी पीक कर्ज काढून खरीप हंगामात पेरणी केली; पण चार आठवड्यांच्या पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके हातची गेली. आता रब्बीची तयारी करायची असल्यास पैशांची गरज आहे; परंतु पेरणीनंतर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने रब्बीसाठी पैसा आणावा कुठून, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
कृषी विद्यापीठ परिसरात २२.८ मि.मी. पाऊसडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात २२.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना पोषक ठरला आहे. तथापि, मूग, उडिदाच्या पिकांची वाढ खुंटलेली असल्याने उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये बीजोत्पादनाचा मूग व उडीद आहे. वातावरणात गारवा२५ जुलैपर्यंत उन्हाळ्याची आठवण करू न देणारे तापमान होते. पाऊस सुरू होताच वातावरणात गारवा निर्माण झाला असून, कमाल तापमान २८ अंशाखाली आले. त्यामुळे प्रचंड उकाडा सहन करणाºया अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे.