शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

मतमोजणीसाठी सज्ज राहा -  जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 2:19 PM

मतमोजणीसाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिले.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी शहरातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय गोदाम येथे होणार असून, मतमोजणीसाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतमोजणी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार, अभयसिंह मोहिते, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे उपस्थित होते. मतमोजणीसाठी पूर्वतयारीचा आढावा घेत, मतमोजणीच्या ठिकाणी अकोला लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय कक्ष तयार करण्यात येणार असून, ओळख तपासूनच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार असून, मतमोजणी परिसरात बॅरिगेट्स लावण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी परिसरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, मतमोजणीच्या ठिकाणी विद्युत पुरवठा व ध्वनिक्षेपक व्यवस्था, जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करुन मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक