शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सतर्क राहा; लसीकरण मोहीम गतिमान करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:23 AM

अकोला : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय रुग्णालय व आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून, जिल्ह्यात लसीकरण ...

अकोला : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय रुग्णालय व आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून, जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृती दल व तांत्रिक समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. डी. अष्टपुत्रे, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. जी. जी. राठोड, डॉ. दिनेश नैताम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी अधिक सतर्क राहून चाचण्या वाढविणे, लसीकरण वेगाने करणे, गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करणे यासारख्या उपाययोजना तातडीने राबवून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने लसीकरण करावे. याकरिता लसीकरण केंद्र वाढवून गर्दीच्या ठिकाणी व ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

..............फोटो................