बाजार समिती कार्यालयात दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान बाजार समितीचे सहसचिव विनोद रमेश कराळे यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याच्या फिर्यादीवरून अकोट शहर पोलीस स्टेशनला संजय गावंडे विरुद्ध भादंविच्या कलम ३६३, २९४, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दि. १८ एप्रिल रोजी पोलिसांनी गावंडे यांना अटक केली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी दि. २१ एप्रिल रोजी गावंडे यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यामुळे अकोला येथील कारागृहातून गावंडे यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. इंगोले, तर गावंडेतर्फे ॲड. आर. बी. अग्रवाल, ॲड. अविनाश अग्रवाल, ॲड. मनोज खंडारे यांनी काम पाहिले.
बाजार समितीच्या सहसचिवास मारहाण; संजय गावंडे यांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:18 AM