फिर्यादी मानसिंग धनसिंग याने तेल्हारा पोलिसात फिर्याद दिली की, दि. १ एप्रिल रोजी त्याने दिवसभर २५ एक्कर गहू हार्वेस्टरद्वारे काढला. त्यामुळे त्याच्याकडे ५० हजार रुपये होते. रात्री ८ वाजता आडसुळ फाट्यानजीक असलेल्या रसवंतीत रस घ्यायला गेला असता आरोपीने मानसिंग धनसिंगजवळील पैसे पाहून त्याला उसाने मारणे सुरू केले. त्याने तेथून हार्वेस्टरजवळ पळून आल्यावर आरोपीने दगड मारून जखमी केले. या धावपळीत खिशातील पैसे पडले, या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी सुरेश सदानंद नवलकार व धीरज सदानंद नवलकार या दोघांविरुद्ध भादंविच्या ३२४, ३३६,५०४, ५०६, ३४ कलमानुसार गुन्हे दाखल केले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एनपीसी गजानन राठोड याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
आडसूळ फाट्यानजीक एकास मारहाण; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:16 AM