अकोला: कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून, पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत, परंतु खासगीत पैसे मोजूनच खाटा उपब्ध होत असल्याने रुग्णांची लूट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मार्च महिन्यात कोरोनाने धुमाकुळ घातला असून मागील वीस दिवसांत आतापर्यंत रेकॉर्डब्रेक रुग्ण आढळून आले. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफूल्ल होत आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे सर्वोपचार रुग्णालयात सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारास पसंती दर्शविताना दिसत आहे. याच परिस्थितीचा लाभ घेत खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध आहेत, पण त्याआधी रुग्णांना पॅकेजेसच्या माध्यमातून पैसे मोजावे लागत असल्याची माहिती आहे.
कोरोना रूग्णांसाठी शहरात उपलब्ध बेड्स - ८८७
रिकामे - सुमारे ३८
शासकीय रूग्णालय - ५६२
रिकामे - सुमारे २०
खासगी रूग्णालय - ३२५
रिकामे - १८
सकीय रूग्णालय खासगी रूग्णालय रिकामे
ऑक्सीजन - १२९
आयसीयू - ६०
व्हेंटीलेटर आयसीयू - ३०
खासगी रूग्णालयांत काय दर? (प्रति दिवस)
ऑक्सीजन - ४०००
आयसीयू - ७,५००
व्हेंटीलेटर आयसीयू - ९,०००
रुग्णांकडून अतिरिक्त वसुली
खासगी रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची फसवणूक होऊ नये, या अनुषंगाने शासनाने दर निश्चित केले आहेत, मात्र काही रुग्णालयांकडून अतिरिक्त दर आकारण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणाच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे होत असूनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून येते.