अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल समिती अकोलाच्यावतीने अमरावती विभागीय स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बुधवारी वसंत देसाई क्रीडांगण येथे करण्यात आले. शिबिर २८ सप्टेंबरपर्यंत राहील. शिबिरामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. शिबिराचे उद्घाटन शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, हापकिडो संघटनेचे अध्यक्ष सेन्साई अरुण सारवान, क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात, आज स्त्रियांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी स्वयंसिद्धासारख्या प्रशिक्षण शिबिरांची नितांत आवश्यकता असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले. कार्यक्रमाला प्रशांत खापरकर, निशांत वानखडे, अजिंक्य वानखडे उपस्थित होते. शिबिर दररोज सकाळ व सायंकाळच्या सत्रात होणार असून, यामध्ये महिला प्रशिक्षणार्थींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. मार्शल आर्ट, कराटे, बॉक्सिंग, कुस्ती, ज्युदो यासारख्या कला शिकविण्यात येतील. तसेच योगाद्वारा मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी विविध आसान शिकविण्यात येईल. तसेच आहारविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. शिबिराला मास्टर ट्रेनर खुशबू चोपडे अकोला यांच्या मार्गदर्शनात सुनीता पाटील कोल्हापूर, सीमा काळे पुणे, रोहिणी बनसोड उस्मानाबाद, मंगेश्री मने भंडारा, प्रणाली वानखडे अकोला, पूजा काळे अकोला, पल्लवी खंडारे नागपूर, आरती शिवले अकोला, प्रीती मिश्रा अकोला प्रशिक्षणार्थींंना मार्गदर्शन करतील
अमरावती विभागीय स्वयंसिद्धा प्रशिक्षणाला सुरुवात
By admin | Published: September 25, 2015 12:59 AM