अकोला: भारत हा विविधतेने नटलेला देश, विविध भाषा, परंपरा, वेशभुषा असलेल्या देशाविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी. भाषेचे आदान-प्रदान व्हावे, या उद्देशाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत ‘भाषा संगम’ उपक्रमास राज्यातील सर्व शाळांमध्ये २0 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व सारक्षता विभागाच्यावतीने राष्ट्रीय एकात्मता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या निमित्ताने २0 नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत ‘भाषा संगम’ हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना मातृभाषेसह देशातील इतर भाषांबद्दल आकर्षण निर्माण व्हावे. प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी. देशातील भाषांची विविधता त्यांना कळावी आणि आमच्या भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आम्ही एकरूप आहोत, हा भाव त्यांच्यात निर्माण झाला पाहिजे, हा उपक्रमामागील उद्देश आहे. ‘भाषा संगम’ उपक्रमांतर्गत देशातील २२ भाषांमध्ये बोलल्या जाणारी पाच वाक्ये परिपाठामध्ये विद्यार्थ्यांकडून वाचून घेतली जाणार आहेत. यासोबतच मुख्याध्यापकांना ‘भाषा संगम’ अंतर्गत शाळेत दैनंदिन कार्यक्रम आयोजित करावे लागणार आहेत. कार्यक्रम घेतल्यानंतर त्याची छायाचित्रे, चित्रफिती ‘भाषा संगम’ यू ट्युब चॅनेलवर दररोज टाकावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)शाळांनी हे उपक्रम घ्यावेतरोज म्हणून घ्या एकेका भाषेतील पाच वाक्य. हे वाचन करवून घेण्यासाठी इतर व्यक्तींनाही आमंत्रित करता येईल, विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करणे, शिक्षकांनी विविध भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधावा.शाळा घेऊ शकतात इतरही उपक्रमकेंद्र शासनाचा ‘भाषा संगम’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. यानिमित्ताने देशातील इतर भाषांची विद्यार्थ्यांना ओळख होईल. इतरांच्या भाषेबद्दल आदर निर्माण होईल. ‘भाषा संगम’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.-प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, जि.प. अकोला.
राज्यातील शाळांमध्ये ‘भाषा संगम’ उपक्रमास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:41 PM