पुलाची दयनीय अवस्था; अपघाताची भीती
मूर्तिजापूर : तालुक्यातील पुलांची दयनीय अवस्था झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
झुकलेले विद्युत खांब ‘जैसे थे’!
चोहोट्टा बाजार : परिसरातील शेतशिवारात कृषी वीजवाहिनीचे बरेच खांब वादळी वाऱ्याने झुकले आहेत. हे खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असतानाही महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.
नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित!
कुरूम/माना : अवकाळी पावसामुळे मार्च महिन्यात चौसाळा परिसरात फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता सात महिने उलटले तरी, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
नाल्या तुंबल्या; आरोग्य धोक्यात!
आलेगाव : नियमित सफाई करण्याबाबत उदासीनता असल्याने येथील नाल्या घाण, कचऱ्याने तुंबल्या आहेत. त्यामुळे गावात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साफसफाईच झालेली नाही. त्यामुळे नाल्या घाण, कचऱ्याने तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.