कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने लाभार्थिंना मोफत धान्याचे वाटप सुरू केले. स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहकांना वेळेवर व शासनाच्या निर्धारित भावाने वाटप करावे तसेच बिल द्यावे, असा पुरवठा विभागाचा आदेश आहे. मात्र, तालुक्यातील पराभवानी व कासारखेड येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थिंना वेळेवर धान्याचे वाटप केल्या जात नसल्याचा आरोप लाभार्थिंकडून होत आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी वाढली आहे. याबाबत लाभार्थिंनी विचारणा केल्यास उडवाउडवीचे उत्तर दिले जाते. धान्य वेळेवर वाटप केल्या जात नसल्याने लाभार्थिंना रेशनच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
---------------------------------
मी स्वस्त धान्य दुकानदारांच्या वितरण प्रणालीबाबत माहिती घेतो. पराभवानी व कासारखेड येथे भेट देऊन पाहणी करतो. चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
- गणेश तांगडे, पुरवठा निरीक्षक बार्शीटाकळी.