शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

आॅनलाइन वाटपातून शिल्लक धान्य नव्या लाभार्थींना मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 2:08 PM

लाभार्थींना आॅफलाइन वाटप वगळता १० टक्के धान्य शिल्लक असून, नव्या लाभार्थींना वाटप करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी ६ डिसेंबर रोजी दिले आहेत.

- सदानंद सिरसाट,अकोला : राज्यात मे २०१८ पासून शिधापत्रिकाधारकांना ‘एईपीडीएस’प्रणालीतून ई-पॉसद्वारे धान्य वाटपाचे प्रमाण गेल्या आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांत ७७ टक्के असल्याचे पुढे आले आहे. लाभार्थींना आॅफलाइन वाटप वगळता १० टक्के धान्य शिल्लक असून, नव्या लाभार्थींना वाटप करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी ६ डिसेंबर रोजी दिले आहेत.आॅनलाइन धान्य वाटपाचा दरमहा शासनाकडून आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील धान्य वाटपाची स्थिती स्पष्ट होत आहे. शिधापत्रिकाधारकांना आॅनलाइन ई-पॉसद्वारे वाटप होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. त्यापैकी १३ टक्के धान्याचे आॅफलाइन म्हणजे, ज्या लाभार्थींचे शिधापत्रिकेसोबत आधार सीडिंग झाले नाही, त्यांच्या नॉमिनींची ‘रुट आॅफिसर’सोबत ओळख पटवून वाटप केले जाते, तर १० टक्के धान्य घेण्यासाठी लाभार्थीच उपलब्ध नाहीत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये धान्य शिल्लक राहत आहे. ते धान्य जिल्ह्यातील वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील इतर पात्र लाभार्थींची निवड करण्याचे निर्देश प्रधान सचिव पाठक यांनी दिले. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. मुदतीत पात्र लाभार्थींची निवड न केल्यास त्या जिल्ह्यातील शिल्लक धान्य इतर जिल्ह्यांसाठी वळते करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

२० डिसेंबरपर्यंत त्रुटी दूर करण्याचा ‘अल्टिमेटम’नवे लाभार्थी निश्चित करण्यापूर्वी सद्यस्थितीत ज्या त्रुटीमुळे धान्य शिल्लक राहत आहे, त्या आधी दूर करण्याचेही बजावले आहे. त्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अन्न सप्ताहापूर्वी दुकानांपर्यंत न पोहोचणे, शिधापत्रिकाधारकांची डाटा एन्ट्री किंवा कार्ड टाइप बदलणे, आधार सीडिंगचे व्हॅलिडेशन अपूर्ण असणे, डी-१ व ईडी-१ रजिस्टरची कामे अपूर्ण आहेत. ती कामे २० डिसेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास संबंधित जिल्ह्यातील शिल्लक धान्य २१ डिसेंबरनंतर वळते करण्याचेही प्रधान सचिवांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला