अकोला : जिल्ह्यातील अतिउपसा झालेल्या ४७३ गावांमध्ये विहिरी खोदता येणार नाहीत, असा अहवाल भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन अंतर्गत निवड केलेल्या अनेक लाभार्थींच्या विहिरी रद्द होण्याची वेळ आली. त्या रद्द झालेल्या विहिरींसाठी नव्याने लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया कृ षी विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी पंचायत समित्यांनी पाठविलेल्या प्रस्तावांनुसार लाभार्थींची निवड रद्द केली जात आहे.जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृ षी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृ षी क्रांती योजना, राष्ट्रीय कृ षी विकास योजनांतर्गत २०१९-२० या वर्षात वैयक्तिक सिंचन विहिरींसाठी लाभार्थी निवड केली. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने ५ फेब्रुवारी रोजी पत्र देत जिल्ह्यातील अतिउपसा तसेच मध्यम स्वरूपातील उपसा झालेल्या गावांची यादी कृ षी विभागाला दिली. त्यानुसार जिल्ह्यात अतिउपसा झालेल्या ४७३ गावांमध्ये विहीर खोदता येत नाही. त्यामुळे त्या गावांमध्ये निवड झालेल्या लाभार्थींची विहिरी रद्द करण्याची वेळ कृ षी विभागावर आली. कृ षी विभागाने सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देत विहिरी रद्द करता येणाºया गावांच्या यादीनुसार प्रस्ताव सादर करावा, असे बजावले. त्यावर जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांमधून २२ प्रस्ताव कृ षी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यावर निर्णय घेऊन प्रतीक्षा यादीतील लाभार्थींची निवड प्रक्रिया लवकरच जिल्हास्तरीय बैठकीत केली जाणार आहे. त्याची तयारी कृ षी विभागाने केली आहे.