शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:55 PM

भारतीय जैन संघटना महिला शाखा अकोला व वुई कॅन फाउंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट उपक्रम सुरू केला आहे.

- नितीन गव्हाळे

अकोला: समाजात वावरताना, अनेक गरीब विद्यार्थी दिसून येतात. परिस्थितीमुळे त्यांना अनेक जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागते. मनात आणूनही त्यांना शालेय साहित्य विकत घेता येत नाही. अशा मुलांना मदतीचा हात द्यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे. या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटना महिला शाखा अकोला व वुई कॅन फाउंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत लोकांकडे असलेल्या जीवनावश्यक वस्तू गोळा करून या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.प्रत्येकाची एक गरज असते आणि ही गरज भागविण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते आपल्या स्वप्नातील अनेक गोष्टी, वस्तू सहजरीत्या खरेदी करू शकतात; परंतु समाजात अनेक विद्यार्थी, पालक असे आहेत की, इच्छा असूनही त्यांना मुलांना चांगले कपडे, पुस्तके, दप्तर, शालेय बूट, चप्पल, सायकलसारख्या गरज असलेल्या वस्तू घेऊन देऊ शकत नाहीत. कारण हलाखीची, गरिबीची परिस्थिती त्यांच्या नशिबी आलेली असते. आपल्याला ज्या अनेक वस्तू जुन्या वाटतात. एकदा वापरल्यानंतर आपण ती वस्तू पुन्हा वापरतसुद्धा नाही. अशा वस्तू बºयाच लोकांना स्वप्नातसुद्धा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वप्नातील वस्तू त्यांना मिळाव्यात. आपल्याजवळ जे रेस्ट आहे, ते बेस्ट बनविणे आपल्या सर्वांच्या हातात आहे. त्यासाठीच भारतीय जैन संघटना महिला शाखा अकोला व वुई कॅन फाउंडेशनच्यावतीने बेस्ट फ्रॉम रेस्ट उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात अकोलेकरांनी योगदान देऊन गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू देऊन त्यांच्या चेहºयावर हास्य फुलवावे. (प्रतिनिधी) कोणत्या स्वरूपात करावी मदत!अनेकदा आपण नवी वस्तू घेतो. काही दिवस वापरतो आणि टाकून देतो. अशा स्कूल बॅग, शूज, चप्पल, स्कूल बॅग, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, खेळणी, सायकल आपण देऊन गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हास्य निर्माण करू शकतो आणि त्यांना पुढे जायला मदतसुद्धा. दानशूर व्यक्तींनी या वस्तू १ जूनपर्यंत द्याव्यात. त्यासाठी ८0८७६६0१४१ क्रमांकावर संपर्क साधावा.१५ सायकली झाल्या गोळाभारतीय जैन संघटना, वुई कॅन फाउंडेशनच्या आवाहनानुसार काही दानशूर व्यक्तींनी गरीब विद्यार्थ्यांसाठी १५ जुन्या सायकली भेट दिल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यातील चार सायकली या नागपुरातील दानशूरांनी दिल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी