शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

सावधान, कोरोना आणखी वाढणार; जीएमसीकडून पर्यायी व्यवस्थेचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:19 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा प्रशासनाचे पर्यायी व्यवस्थेवर विचार मंंथन सुरू असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा सर्वाधिक ताण सर्वोपचार रुग्णालयावर पडत आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात कोविडसाठी ४५० खाटा राखीव आहेत; परंतु येणाऱ्या काळात रुग्णसंख्या आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा प्रशासनाचे पर्यायी व्यवस्थेवर विचार मंंथन सुरू असल्याची माहिती आहे.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयाव्यतिरिक्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, दोन खासगी रुग्णालय आणि तीन हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, मूर्तिजापूर ग्रामीण रुग्णालयातही, तशी व्यवस्था केली आहे; मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने उपलब्ध खाटांची कमी भासू लागली आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयातील १४ वार्डांमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या महिनाभरात जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणखी वाढणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन खाटांची संख्या वाढविण्याच्या तयारीत आहेत.

जीएमसीला हवे पर्यायी रुग्णालयअकोला जिल्ह्याच्या आरोग्याचा भार एकमेव सर्वोपचार रुग्णालयावर आहे; मात्र इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास, त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय यांसह उप-जिल्हा व ग्रामीण रुग्णालये कोविडसाठी अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत; परंतु अकोल्यातील स्थिती गंभीर आहे. अकोल्यात जिल्हा रुग्णालयच नाही, तर महापालिकेच्या रुग्णालयात केवळ रुग्ण तपासणी केली जात आहे. याशिवाय ग्रामीण रुग्णालयेदेखील इतर जिल्ह्यातील रुग्णालयांप्रमाणे अ‍ॅक्टिव्ह नाहीत. सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसंख्येचा वाढता ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडे पर्याप्त व्यवस्था असली, तरी त्याचा उपयोग होताना दिसून येत नाही.

६० खाटा व्हेंटिलेटरसाठी राखीवकोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयातील व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात आली आहे.आगामी काळात वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता, सर्वोपचार रुग्णालयात ६० खाटा व्हेंटिलेटरसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे; मात्र रुग्णांसाठी आवश्यक सर्वच व्यवस्था केली जात आहे. रुग्णसंख्येचा वाढता ताण पाहता वाढीव खाटा किंवा पर्यायी व्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी,अकोला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय