हे बदल काळजी वाढविणारे
ताप नसताना पॉझिटिव्ह
डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्यांची रॅपिड चाचणी केल्यानंतर अनेक जण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे निदान होत आहे. यामध्ये बहुतांश रुग्णांना साधारण ताप असतो. तीव्र ताप येणे हे डेंग्यूचे प्रमुख लक्षण आहे. तथापि, पहिल्यांदा डेंग्यू होणाऱ्यांमध्ये बहुतांश वेळा तीव्र लक्षणे दिसत नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
प्लेटलेट कमी नाही, तरी पॉझिटिव्ह
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट कमी होणे सामान्य आहे. तथापि, अनेक पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये असे आढळून येत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. दुसऱ्यांदा डेंग्यू होणाऱ्यांमध्ये प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण जास्त असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पॅथॉलॉजिस्ट म्हणतात...
डॉक्टरांनी रुग्णाच्या ज्या चाचण्या सुचविल्या असतील, त्याच आम्ही करतो. सध्या डेंग्यूसाठी डॉक्टर एनएस १ अर्थात डेंग्यू रॅपिड हीच चाचणी प्रामुख्याने केली जात आहे. शहरातील सर्वच लॅबमध्ये दिवसाकाठी सरासरी ५ ते ८ चाचण्या केल्या जात आहेत. मोठ्या लॅबमध्ये हे प्रमाण जास्तही असू शकते.
- संजय सरोदे, पॅथॉलॉजिस्ट
सध्या व्हायरल व डेंग्यूसदृश लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी डासांची पैदास होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आल्यास रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
- वंदना पटोकार-वसो, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
जिल्ह्यातील डेंग्यू रुग्ण
ग्रामीण भाग - ९ (कन्फर्म)
शहरी भाग - ७२ (संशयित)