Bharat Jodo Yatra: आत्महत्याग्रस्त विधवांचा राहुल गांधींशी हाेणार संवाद

By राजेश शेगोकार | Published: November 14, 2022 12:02 PM2022-11-14T12:02:49+5:302022-11-14T12:03:31+5:30

Bharat Jodo Yatra: भारत जाेडाे यात्रा साेमवारी विदर्भात दाखल हाेत असून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमाेर खुद्द आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी मांडणार आहेत.

Bharat Jodo Yatra: Suicide widows will interact with Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra: आत्महत्याग्रस्त विधवांचा राहुल गांधींशी हाेणार संवाद

Bharat Jodo Yatra: आत्महत्याग्रस्त विधवांचा राहुल गांधींशी हाेणार संवाद

Next

- राजेश शेगाेकार  
अकाेला : भारत जाेडाे यात्रा साेमवारी विदर्भात दाखल हाेत असून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमाेर खुद्द आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी मांडणार आहेत. महिला किसान मंचच्या पुढाकारातून अकाेल्यात या शेतकरी महिला राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

 भारत जाेडाे यात्रा साेमवारी वाशीम जिल्ह्यात प्रवेश करत असून, बुधवारी संध्याकाळी अकाेल्यातील पातूर येथे यात्रेचा मुक्काम असेल. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अकाेल्याचाही समावेश असून, याच भूमीत आत्महत्यांमागील वास्तव तसेच घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर या महिलांनी सावरलेली शेती व संसार याची कथा अन् व्यथा शेतकरी महिला व्यक्त करणार आहेत. महिला किसान मंचच्या सीमा कुलकर्णी यांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांचे संघटन उभे राहिले आहे. या महिलांनी पतीच्या निधनानंतर शेती साेडून न देता शेती कर्जमुक्तही केली व संसारही सावरला आहे त्यामागील संघर्ष राहुल गांधी जाणून घेणार आहेत.

पारंपरिक ३८ प्रकारच्या बियाण्यांची देणार भेट  
लाेकसंघर्ष माेर्चाच्या वतीने राहुल गांधी यांना पारंपरिक ३८ प्रकारच्या बियाण्यांची भेट दिली जाणार आहे. आपल्या मातीला समृद्ध करणारा ठेवा यानिमित्ताने अधाेरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती लाेकसंघर्ष माेर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली.

शेगावची सभा देशात परिवर्तन घडवेल - पटोले 
nनांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता लोकांची यात्रा झाली आहे. लोक स्वयंस्फूर्तपणे यात्रेत सहभागी होत आहेत. जनतेचा वाढत चाललेला पाठिंबा पाहता शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेत आजपर्यंतचे सर्व रेकाॅर्ड तोडणारी गर्दी होईल. तसेच ही सभा राज्यातच नव्हे, तर देशात परिवर्तन घडवेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.  
nपत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव खतगावकर, माध्यम विभागाच्या महिमा सिंह, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार यांची उपस्थिती होती.

Web Title: Bharat Jodo Yatra: Suicide widows will interact with Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.