तेल्हारा /दानापूर : जिल्हा परिषद निवडणूक १९ एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीमध्ये माजी जि. प. सदस्य राजीव खोने यांचे चिरंजीव श्रीकांत खोने हे १0४३ मते घेऊन विजयी झाले, तर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दानापूर गाव दत्तक घेऊनही भाजपचे उमेदवार सुरेश डाबेराव यांचा पराभव झाला. राजीव खोने यांच्या निधनानंतर दानापूर जि.प.ची पोटनिवडणूक जाहीर झाली व १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. २१ एप्रिल रोजी तेल्हारा तहसील गोदामामध्ये पाच टेबलवर २0 केंद्रांची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीसाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासूनच भारिपचे उमेदवार श्रीकांत राजेश खोने हे आघाडीवर होते. त्यांना २९४२ मते मिळाली. भाजपचे उमेदवार सुरेश डाबेराव यांना १८९९, काँग्रेसचे मधुकर मावसे यांना ७८३, मनसेचे बालराम सांगळे यांना ६९३, शिवसेनेचे संजय सोनोने यांना ५४५, तर अपक्ष उमेदवार कुवरसिंग मावळे यांना १४८ मते मिळाली. या निवडणुकीत भारिपचे उमेदवार श्रीकांत खोने हे १0४३ मते घेऊन विजयी झाले. उमेदवार विजयी होताच भारिपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, भारिपचे जिल्हा संघटक सुभाष रौंदळे, प्रकाश खोब्रागडे, तेल्हारा पंचायत समितीच्या सभापती आशा इंगळे, भारिप-बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष विकास सदांशिव, प्रतिभा अवचार, श्रीकृ ष्ण विरघट, कॉटन मार्केटचे संचालक श्रीकृष्ण वैतकार, माजी सरपंच दीपमाला दामधर, संजय हिवराळे, अमोल तिखट, अशोक दारोकार, श्रीकृष्ण विरघट, गजानन विरघट, शिवा जांगळे, सम्रत मांडोकार, मुरलीधर खोने, प्रकाश विरघट, सुमेध वाकोडे, मुन्ना लाहोडे, प्रदीप बोरसे, अशोक इंगळे, उपसरपंच महादेव वानखडे, राहुल विरघट, कैलास घायल, गोपाल विरघट यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी, तर सहायक म्हणून नायब तहसीलदार भारत किटे, निवडणूक विभागाचे जुमळे यांनी काम पाहिले. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेल्हारा ठाणेदार अनिल ठाकरे यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता. निकालानंतर आता गावागावात निवडणुकीच्या विेषणांची चर्चा सुरू झाली असून या निकालाचे पडसाद भविष्यातील राजकारणावर पडतील अशी चर्चा आहे.
जि.प.च्या पोटनिवडणुकीत भारिपचा विजय
By admin | Published: April 22, 2017 1:18 AM