- योगेश फरपट खामगाव : आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी खर्चीले, त्यांचे कार्य अफाट आहे. त्यांचे कार्य सदैव स्मरण रहावे यासाठी त्यांचे जीवनावर ग्रंथनिर्मिती करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच जाहीर केले आहे. दरम्यान आता राज्यातील फळबागायतदार शेतकरी अधिकाधिक झपाट्याने विकसीत व्हावा, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्यात येणार असल्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेसाठी दरवर्षी २०० कोटी रूपये राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. या योजनेमध्ये आंबा, डाळींब, काजु, पेरू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस, कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ या फळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कोकणात १० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रात ६ हेक्टर पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. याबाबतचा संपुर्ण विस्तृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ या नव्या योजनेमुळे स्व.भाऊसाहेबांच्या स्वप्नांप्रमाणे शेतकऱ्यांचा खरा विकास होणार असून ते स्वावलंबी निश्चितच बनतील.
राज्यात आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:52 PM
खामगाव : आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देराज्याच्या मंत्रीमंडळाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्यात येणार असल्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे.याबाबतचा संपुर्ण विस्तृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.