शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

भिका-यांनाही मिळेना भीक!

By admin | Published: November 13, 2016 2:18 AM

सुट्या पैशांचा मोह सुटेना; नागरिकांचा आखडता हात.

अतुल जयस्वालअकोला, दि. १२- हजार-पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर अद्यापपर्यंत नवीन नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत. सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर नागरिकांचा कल आता सुटे पैसे जपण्याकडे अधिक आहे. सुट्या पैशांचा मोह सुटत नसल्यामुळे मंदिरांसमोर बसलेल्या तसेच दारोदारी भीक मागणार्‍यांच्या झोळीत पैसे टाकताना नागरिक आखडता हात घेत असल्याचे वास्तव अकोला शहरात समोर आले आहे. गरजूंना आपल्या कुवतीनुसार दान करण्याची भारतीय संस्कृती आहे. यामुळे पुण्य पदरी पडते, अशी श्रद्धा आहे. अनेक जण आपल्या इच्छेनुसार गरिबांना दान करतात. शहरात मंदिरांसमोर तसेच दारोदारी भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या निराधारांची संख्या मोठी आहे. बागातली देवी, शनि मंदिर, संतोषी माता मंदिर, राम मंदिर, गणेश मंदिर यासह शहरातील विविध मंदिरांसमोर अनेक निराधार व्यक्ती बसलेल्या असतात. मंदिरांमध्ये येणारे भाविक त्यांच्या झोळीत यथाशक्ती पैशाच्या स्वरुपात दान टाकतात. त्यावरच या निराधारांचा उदरनिर्वाह चालतो. केंद्र सरकारने हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा अप्रत्यक्ष परिणाम या भिक्षेकर्‍यांवरही पडला आहे. या नोटा रद्द झाल्यानंतर नागरिकांपर्यंत अजूनही नवीन नोटा पोहोचलेल्या नाहीत. जवळच्या शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या चलनी नोटा दैनंदिन वस्तू खरेदी करण्यात खर्ची पडल्यानंतर आता नागरिकांना या नोटांची चणचण भासत आहे. त्यामुळे जेवढे पैसे जवळ आहेत, ते जपण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे नागरिक भिक्षेकर्‍यांना दान देताना आखडता हात घेत आहेत. पूर्वी पाच ते दहा रुपयांपर्यंत दान देणारे नागरिक आता या नोटा स्वत:कडे ठेवण्यातच धन्यता मानत आहेत. अशातच सुट्या पैशांचीही वानवा आहे. त्यामुळे भिक्षेकर्‍यांची मिळकत घटल्याचे ह्यलोकमतह्णने त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेतून समोर आले आहे. पूर्वी दिवभरात ४0 ते ५0 रुपयांपर्यंत होणारी मिळकत आता १0 ते १५ रुपयांपर्यंत कमी झाल्याचे भिक्षेकर्‍यांनी सांगितले.

शुक्रवार गेला निरंकसंतोषी माता मंदिरात शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी असते. या शुक्रवारी मात्र भाविक फारसे मंदिराकडे फिरकले नाहीत. जे फिरकले त्यांनी काहीच दिले नसल्याची खंत कांताबाई झोंबाडे व अनुसयाबाई शेगोकार यांनी बोलून दाखविली.

-सकाळपासून एकाही भाविकाने पैसे दिले नाहीत. आज तुम्हीच पहिले भाविक आहात. दोन दिवसांपासून मिळकत कमी होत आहे.

- मोहन सदाना व शे. मोहम्मद.