..........
रेल ओव्हर ब्रिजसाठी निधी
द्या अकाेला : शहराला लागून असलेल्या न्यू तापडीयानगर रेल ओव्हर ब्रिज अर्थात, आरओबीला मान्यता मिळाली असून, गेल्या काही वर्षांपासून कंत्राटदार बांधकामाच्या जुन्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे काम संथगतीने होत, त्यामुळे रेल्वे ट्रकवरील कार्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रश्मी शैलेष देव यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
..............................
विश्वकर्मा विराट संघ जिल्हाध्यक्षपदी मनीष रुल्हे
अकोला : अ.भा.विश्वकर्मा विराट संघ, महाराष्ट्रच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी मनीष आनंद रुल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुल्हे हे बाळापूर येथील रहिवासी आहेत, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत गवळी, सरचिटणीस पी.व्ही. क्षीरसागर यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली आहे.
...........................
‘सोयाबीन शेतकरी स्पर्धा’
विजेत्यांना पारिताेषिक
अकोला : जिल्ह्यात पाणी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धांतर्गत ‘सोयाबीन शेतकरी स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांना दोन सायकल कोळपे संयत्र, चिकट सापळे व प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, बार्शीटाकळी तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, विद्या वाकोडे यांची उपस्थिती होती.
..................................
पूरग्रस्तांना धान्यवाटप
अकोला : डाबकी, लुंबिनीनगर, तसेच सोपिनाथनगर येथील पूरग्रस्तांना वंचित बहुजन महिला आघाडी महानगरच्या वतीने सदर पूरग्रस्तांना धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महासचिव प्रा.मंतोष मोहोळ, रेखाताई गवई, वर्षाताई हिवराळे, राजकन्या वानखडे, शीलाताई आठवले, अनिता शेगोकार, ॲड.वानखडे यांनी सहकार्य केले.
..................................