शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

विद्यार्थ्यांसाठी सायकल खरेदीची योजना रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:42 AM

१ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याच्या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भाजपने सुरुंग लावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याच्या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भाजपने सुरुंग लावला आहे. सायकल खरेदीसाठी ८७ लाख ६६ हजार रुपयांच्या तरतुदीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या अधिक बिकट होणार असल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याची आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले आहे.महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांनी विद्यार्थी व महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून विविध योजना राबविण्यास प्रारंभ केला. मनपा शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शहरातील गरजू कुटुंबातील महिलांना विविध साहित्याचे वाटप केले जाते. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सभापती भन्साली यांनी मनपाच्या प्रत्येक शाळेमध्ये ‘आरओ’ प्लांट लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे.यादरम्यान, मनपा शाळेत इयत्ता पाचवी, सहावी तसेच सातवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध व्हावी, यासाठी तब्बल ८७ लक्ष ६६ हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली. तसेच हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी स्थायी समितीच्या समोर सादर केला. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भावना व गरज लक्षात घेता सत्ताधारी भाजपकडून सायकल खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र हा प्रस्ताव निधी अभावी रखडला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सहा वर्षांपासून लाभार्थी वंचितमहापालिकेत भाजपाची २०१४ पासून सत्ता असली तरीही महिला व बालकल्याण समितीमार्फत शाळेतील विद्यार्थी व शहरातील गरजवंत महिलांना मदतीसाठी मागील सहा वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. सायकल खरेदीच्या निर्णयावर पाणी फेरल्यामुळे इयत्ता पाचवीतील ७५४ विद्यार्थी, इयत्ता सहावी - ६११ तसेच इयत्ता सातवीमधील ५८३ असे एकूण १,९४८ विद्यर्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका