लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पर्यावरण रक्षण व सायकलीला राष्ट्रीय वाहन घोषित करावे, या जनजागरांसाठी येथील ५0 महाविद्यालयीन मुलांची सायकल रॅली बुधवारी दिल्लीकरिता रवाना झाली.सायकल मित्र परिवार व रेडक्रॉस अकोल्याच्यावतीने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ८.३0 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रांगणातून उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व इतर मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. ही सायकल रॅली दिल्ली येथे १५ ऑगस्ट रोजी पोहोचणार आहे. रॅलीमधील मुले तेथे पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन सादर करणार आहेत. या रॅलीला रवाना करतेवेळी रेडक्रॉसचे प्रभजीतसिंग बछेर, सायकल मित्र परिवाराचे गजानन खेडकर, रत्नकुमार गडेकर, गोपाळ मुळे, ज्ञानदेव जगदाळे, कृष्णा पवार, दीपक शिंदे, गणेश पवार, हर्षदीप वानखडे, तरुण वानखडे, रामभाऊ रोड, पांडुरंग चौहान, नीलेश खेडकर, निशांत पवार, सौरभ खेडकर, सुहास जाधव, यमुनाताई जाधव, आशा खेडकर आदींची उपस्थिती होती.
सायकल रॅली दिल्लीला रवाना
By admin | Published: June 22, 2017 4:14 AM