अकोला, दि. १२: जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला जिल्हय़ातील पंचायत समितींचे गटविकास अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याच्या मुद्दय़ावर सोमवारी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार गटविकास विकास अधिकार्यांविरुद्ध (बीडीओ) कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले. वारंवार सूचना देऊनही जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला पंचायत समितींचे गटविकास अधिकारी उपस्थित राहत नसल्याने, यासंदर्भात कारवाईचा ठराव मागील स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. त्यानुषंगाने काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा स्थायी समितीच्या सभेत विजय लव्हाळे यांनी केली. सभेला ह्यबीडीओह्ण हजर राहत नसल्याच्या मुद्दय़ावर विजय लव्हाळे, शोभा शेळके, डॉ. हिंमत घाटोळ, रामदास लांडे यांनी आक्रमक पवित्रा घेत, कारवाई करण्याची मागणी लावून धरली. यासंदर्भात ह्यबीडीओंह्णविरुद्ध कारवाईच्या ठरावाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सभेचे सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे सभागृहात सांगितले. पातूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे यांच्याकडील तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा आकसापोटी प्रभार काढण्यात आल्याचा आरोप सदस्य लव्हाळे यांनी सभेत केला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, कृषी सभापती माधुरी गावंडे, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांच्यासह सदस्य दामोदर जगाताप, विजय लव्हाळे, रामदास लांडे, शोभा शेळके, डॉ. हिंमत घाटोळ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘बीडीओं’विरुद्ध कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविणार!
By admin | Published: September 13, 2016 3:06 AM