कुरणखेड परिसरात राबविणार कलिंग ऑपरेशन
बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे कुरणखेड गावात कलिंग ऑपरेशन, मॉपिंग ऑपरेशन आणि कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत धोकादायक असलेल्या कोंबड्यांना मारण्यात येणार असल्याची माहिती आहे. हेच ऑपरेशन काही दिवसांपूर्वी बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथे राबविण्यात आले होते.
यांनी घ्यावी काळजी
कोंबड्यांसह इतर पक्ष्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मास्कचा वापर करावा, नियमित साबणाने हात धुवावे.
ज्या ठिकाणी पक्षी ठेवण्यात आले, अशा ठिकाणांसह परिसर निर्जंतुकीकरण करावा.
कुरणखेड परिसरातील मृत पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर इन्फेक्टेड झोन घोषित करण्यात आला आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. विविध ऑपरेशनच्या दरम्यान ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
- डॉ.तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला